
"सुवर्णमहोत्सवी लेखाजोखा - भाग ७४"
- dileepbw
- Dec 4, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७४"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन संपन्न होऊन एक सप्ताह पूर्ण झाला असला तरी अजूनही त्याची "झिंग" काही मनातून जात नाही.या सर्व स्मृती "चित्रबध्द" करण्यात आल्या असून त्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.सर्वांनी जरूर रमावे त्यात ! https://drive.google.com/drive/folders/1NaAVUZp1PN-OIfedihpeX9nJxa-t1hqY?usp=drive_link
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन संपन्न झाले असले तरी अजून बरीच कामे बाकी आहेत.त्यातले सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे आपली "अविष्कार" ही "E -DIRECTORY Cum SOUVENIR" " ! हे काम सर्वांगसुंदर व परीपूर्ण व्हावे यासाठी संयोजन समिती कंबर कसून काम करीत आहे.आपण फक्त एवढीच मदत करायची.कराल ना ?
सर्वांनी आपला "GOOGLE FORM" भरलेला असल्याची खात्री करून घ्या.आपला डिसेक्शन पार्टनर,प्रॅक्टिकल पार्टनर,हाॅस्पिटल बॅचमेट,रूम पार्टनर,इंटर्नशीप पार्टनर यांना देखील खालील संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती द्यायला सांगा.कुणीही रहाता कामा नये.काहीही अडचण आल्यास डिरेक्टरी कमिटी(गोरख चिंधे,बाळासाहेब घोंगाणे व सुभाष सुराणा) बरोबर संपर्क साधा.
हा फार्म आजच न विसरता भरा.१९७३ सालातला फोटो सापडला नाही तर लग्नातला,पासपोर्टवरचा,आय कार्डवरचा असा कुठलाही फोटो वापरा.पण आज काहीही करून फार्म भरून पूर्ण कराच !






Comments