"राखीपौर्णिमेनिमित्त गाऊ त्यांच्या आरती"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"राखीपौर्णिमेनिमित्त गाऊ त्यांच्या आरती"
(गाऊ त्यांना आरती – कवी यशवंत यांची क्षमा मागून)
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या तयारीला लागलेल्या सर्व वर्गभगिनींना राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
आज राखीपौर्णिमेनिमित्त त्यांच्यासाठी कवी यशवंत यांच्या कवितेचे एक विडंबन सादर करतो.ऐका.
"BJMC 1973 Batch च्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे सरस्वती वंदन"
वंदनी नृत्यांगना त्या
अग्रणी धैर्यमेरू संमेलनी
शीला,प्रतिमा,आरती
किती गाऊ त्यांच्या आरती !
जन्मल्या त्या भारती,
आता जरी अंतरभारती
मातृसंस्थेच्या जपती स्मृती
गाऊ त्यांना आरती. ||१||
कामत अंधारे मार्गी
सरवटे ही सरसावले
उदयने त्यांना फर्मावले
संभ्रमी खुर्द जाहले
नसली कृष्णापरी सारथी,
गाऊ त्यांना आरती ||२||
मैत्र हेतूला दिला संक्षेप ज्यांनी
विन्या,अरविंद,नरेंद्र ते झटती
प्रयत्ने दीप्याच्या खानदेशी सामावती,
गाऊ त्यांना आरती ||३||
मैत्र ज्यांचा देव,सेवा ज्यांचा धर्म हो
ऋणमुक्ति ज्यांचे ध्येय हो
आणि मातृप्रेमा जिंकिती काळाप्रती,
गाऊ त्यांना आरती ||४||
वेळ जावो,धन जावो,नाहि ज्यांना तत्क्षिती,
मित्रसेवा दे रती
आणि सुदामापरी देतात जे आत्माहुती,
गाऊ त्यांना आरती ||५||
जाहले दिग्मूढ मित्र हे धन्यवादा अर्पिती
क्षाळुनी त्यांची मने,
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती,
गाऊ त्यांना आरती ||६||
नेटके सर्व काही घडे,काय कमी भोजना,
किशा विचारी मन्मथा
भरू की प्याला ‘एवढी होवो तरी रे सत्कृति,
गाऊ तयांची आरती. ||७||
Comments