"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग २"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग २"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
भुसावळचा "विजय भंगाळे" म्हणजे आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा "नारायण" ! त्याने माझी "कुचंबणा" लगेच ओळखली व मला अठ्ठावन्न नंबरला घेऊन गेला.
पॅथाॅलाॅजी OPD आतून पहाण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग ! त्यात त्याने मला सरळ Stool Examination च्या खोलीत Stool Slide Preparation करायलाच बसवले. मरता क्या न करता ? "नाक मुठीत धरून" लॅब अटेंडंट "मिस्किन" ला शरण गेलो.
तासभर ते काम केल्यावर मग प्रमोशन मिळाले. लॅब अटेंडंट "आल्हाट" च्या युरीनच्या टेबलवर माझी रवानगी झाली. शेवटचा अर्धा तास लॅब अटेंडंट "जमदाडे" च्या सिमेनच्या टेबलवरील सुगंधात घालवल्यावर विजयने मला बाहेरच्या Haemogram च्या खोलीत "पीटर" च्या ताब्यात दिले व आठ दिवस तिथेच काम करायचा "मोलाचा सल्ला" दिला.तो मी कसोशीने पाळला व त्यामुळे श्रीनिवास गोखले सरांचा "पट्टशिष्य" बनलो व माझा CCL मधला "राबता" (व हळूहळू वट) वाढला.






Comments