"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ४"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ४"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
माझी लेक्चररशीप हे "अळवावरचे पाणी" आहे याची जाणिव विजय भंगाळे मला सातत्याने करून देत असे. लेक्चररशीपचा पगार कसा मिळवायचा व तो कसा सांभाळायचा याचे "आर्थिक गणित" विजानेच मला समजावून सांगीतले.
क्लर्क "किरवे" च्या दाढीला हात लावून "खुल जा सिमसिम" असा एक "सिक्रेट कोड" पगारपत्रकावर टाकावा लागत असे. मगच सरकारी धनादेश हातात पडत असे.विजाने चार महिन्याचा लेक्चररशीपचा पगार म्हणजे रेसिडेन्सीचे वर्षभराचे विद्यावेतन हे "गणित" डोक्यात पक्के बसवले होते. ते जपून वापर असे तो वारंवार सांगत असे.त्याचा हा "लाखमोलाचा सल्ला" मला आयुष्यभर कामाला आला.






Comments