"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ६"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ६"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
आपल्या "पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण म्हणजे भुसावळचा विजय भंगाळे" ! मी डिपार्टमेंटला रुजू झालो तेव्हा हरीश म्हात्रे,कल्पना पै,दिवाणे हे परीक्षार्थी होते. सर्वजण पास झाल्याच्या आनंदात डिपार्टमेंटलाच "पार्टी" करायचे ठरले.
कल्पना पै मॅडमचा खास "कोकणी कार्यावली" समुद्रातील भाजीचा बेत होता.विजाने हरीश म्हात्रे सरांकडून चार पायांची भाजी करूवून घेण्याचा विडा उचलला होता.दिवाणे सरांकडे घरून पोळ्या व भात करून आणायची जबाबदारी होती.सर्व "बेत" एकदम छकास !
तेव्हा "वारूणी" फारशी प्रचलित नव्हती.त्यामुळे हा शुध्द सात्विक बेत आपल्या प्रॅक्टिकल हाॅलमधेच संपन्न झाला होता.






Comments