"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १२"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १२"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटच्या नारायणाने म्हणजेच भुसावळच्या विजय भंगाळेने माझ्या MD पर्यंतच्या प्रवासात कसा मोलाचा सहभाग दिला ते तुम्हाला सांगीतले.आता आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटच्या नारायणाने म्हणजेच भुसावळच्या विजय भंगाळेने मला MD पश्चात कसे जबाबदारीने "मैत्र" दिले त्या आठवणी सांगतो.
गोखले सरांच्या घरची पार्टी संपताच दुसर्याच दिवशी विजय भंगाळेने माझ्या मागे आता प्रॅक्टिस सुरू करायच्या तयारीला लाग असा "धोशा" लावला.पुस्तकांमधे नसलेल्या अनेक व्यवहाराच्या गोष्टी त्याने मला या काळात शिकवल्या.मुंबईला प्रिंसेस स्ट्रीटवर घेऊन गेला.सगळा पॅथाॅलाॅजी उपकरणांचा बाजार दाखवला.चांगले-वाईट,स्वस्त-महाग रिएजंटस् व उपकरणे ओळखायला शिकवले.या ज्ञानाचा मला संपूर्ण आयुष्यात खूप उपयोग झाला.
विजय भंगाळेला भुसावळला प्रॅक्टिस सुरू करायची असल्याने त्याने सर्व उपकरणांचे "दोन सेट" खरेदी केले होते. एक बंद पडल्यास दुसरे स्टॅंड बाय ! भुसावळला दुरूस्तीसाठी येणार कोण ? हे शहाणपण पुस्तकातून कसे शिकणार ? त्यासाठी असे "नारायण" च हवेत.
शेवटी एकदा मी त्याला चेष्टेने म्हटले देखील ! विजा,आता आपण "घोडनवरे" झालो आहेत.बायकापण "दोन" करूयात का ? एकीला स्टॅंड बाय दुसरी ! त्यावर तो काय म्हणाला हे वाचा पुढील लेखात !






Comments