"उदयचा नातू अगस्त्य"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"उदयचा नातू अगस्त्य"
आज स्वत:ला "चार्वाक" रूषींचा अवतार समजणार्या उदय अजोतिकरच्या आवर्जून "अगस्त्य" रुषींचे नाव ठेवलेल्या नातवाचा चवथा मासिक वाढदिवस ! त्याचे मन:पूर्वक अभिनंदन !
चार्वाक" रूषींचे तत्वज्ञान समजायला एकदम सोपे ! खावे,प्यावे व सुखात रहावे ! देव,स्वर्ग,नरक, पाप-पुण्य असे काहीही नसते.माझ्या आईची आई म्हणजे आजी तिला पाया पडलो की अहिराणी भाषेत एक आशिर्वाद द्यायची. "खाव्वा, पेव्वा,सुखन सुखन राव्वा" ! हेच "चार्वाक तत्वज्ञान" ! उदय यांचा भक्त !
अशा या उदयने नेम धरून,शोधून काढून, चारचौघांना विचारून, आपल्या नातवाचे नाव "अगस्त्य" असे ठेवले आहे.प्राचीन भारतीय साहित्याची सतत खिल्ली उडवणार्या व सनातन धर्माचा तिटकारा असलेल्या नास्तिक उदयने "अगस्त्य" हे नाव त्या रूषींच्या कार्याचा अभ्यास करून ठेवले असेल अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे तो अभ्यास मीच क्रमश: सादर करेन.वाचा नाही तर पुसून टाका.
Commentaires