"गुरुविना ना मिळे ज्ञान"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"गुरुविना ना मिळे ज्ञान"
©दिलीप वाणी,पुणे
ग्रुपमधील सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुविना ना मिळे ज्ञान!
ज्ञानाविना ना मिळे सन्मान !!
गुरु आहेत प्रेमाची छाया!
चला नमन करू ‘गुरुराया’ !!
मंगलने रायचूरसरांची आठवण काढल्याने मला "गुरु आहेत प्रेमाची छाया" असे काही प्रसंग आठवले.सांगतो.
१९८२ सालातल्या मकरसंक्रांतीला माझा MD चा रिझल्ट लागताक्षणी रायचूरसरांनी मला केबिनमधे बोलावून घेतले. माझ्या हातावर तिळाची वडी ठेवली व म्हणाले तुझ्या आजोबांचे गाव कुठले रे ? खानदेशातले का ? मी हो म्हणताच ते म्हणाले म्हणजे तू लाडसक्का का ? मी उडालोच.हा शब्द रायचूरसरांना कसा काय माहित ? मी "हो" म्हणताच रायचूरसर म्हणाले "वाटलेच मला ?" तुझ्यासाठी माझ्या मित्राची मुलगी पाहून ठेवली आहे.जा पाहून ये !
शिक्षकाचे महत्व खूप मोठे आहे.माझा एक अनुभव सांगतो. महाराष्ट्र शासनाकडून माझ्यावर सातत्याने अन्याय होत गेला याची रायचूरसरांना खूप "बोच" असायची.त्यामुळे मला त्यांनी केंद्र शासनाचे दरवाजे ठोठावायला प्रोत्साहीत केले. तीन वेळा UPSC च्या परीक्षा द्यायला लावल्या.तीन वेळा "चलो दिल्ली" करायला लावले.तीन ही वेळा मी मुलाखतींमधे यशस्वी होऊन परतलो तेव्हा कुठे रायचूरसरांचे समाधान झाले.माझा "बंदा रूपाया" दिल्ली दरबारी खणकन वाजला असे ते सर्वांना सांगत असत.अशी ही गुरूची माया !
मी माझ्या शाळेपासूनच्या सर्वच शिक्षकांना "आचार्य देवो भव" मानतो.आजकालच्या विद्यार्थ्यांना मात्र शिक्षकांविषयी अशी आदर भावना वाटत नाही.का ? "गुगल" वरील माहितीच्या महाजालामुळे ? त्यामुळे ही मुले पक्की व्यवहारी, भावशून्य व उद्धट बनत चालली आहेत असे वाटते.आपला काय अनुभव ?






Comments