top of page

"गेले ते दिन गेले - भाग ३"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

Updated: Sep 3, 2023

"गेले ते दिन गेले - भाग ३"

UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या ह्रद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.

आपल्या विद्यार्थी दशेत आपल्या वसतीगृहाजवळ खानपानासाठी "सेंट्रल हाॅटेल" हा एकच पर्याय उपस्थित होता. नंतर तेथे "अन्नापुर्णा" ची गाडी आली.डी ब्लाॅकच्या भिंतीलगतच नाश्त्याची आणखी एक सोय वाढली.मसाला चहाची सुद्धा एक गाडी आली.भिंतीच्या झरोक्यातून सुरेख चहा मिळू लागला.त्यामुळे डी ब्लाॅकच्या गार्डनमध्ये "गप्पाष्टक" रंगू लागली.तेथल्या दगडी चौथर्‍यावर "मैफिली" रंगू लागल्या.

काळाच्या ओघात काळेमावशींचा स्टीलच्या चकचकीत डब्यातला खमंग कांदापोहे,उपीट,कधी साबुदाणा खिचडीचा नाश्ता आला.टापटीप अन स्वच्छता राखून डबे देणाऱ्या काळेमावशी लवकरच लोकप्रिय झाल्या.

चहावाल्या अण्णाच्या मुलांनी नंतर "जोडधंदे" सुरु केले.

एका बाजूला तिरुपतीचे चविष्ट "प्रसादाचे लाडू" १० रु. ला मिळू लागले तर दुसरीकडे "मिलिटरी रम" चा नक्षीदार काचेचा खंबा खोलीपोच होऊ लागला.

आपला कार्यकाळ संपला व वसतिगृहाचे राहणे अगदी स्वयंपूर्ण झाले !

(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page