"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १०"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १०"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटच्या नारायणाने म्हणजेच भुसावळच्या विजय भंगाळेने माझ्या MD परीक्षेच्या वेळी नारायणाची भूमिका चांगलीच वठवली होती.जरासंधवधाचा किस्सा व महाभारत महायुध्दाचा शेवटचा दिवस तुम्हाला सांगीतला.या लेखात MD परीक्षेची "सांगता" सांगतो.
तो १४ जानेवारी,१९८२ मकर संक्रांतीचा दिवस होता ! श्रीमंत अडसूळने दुसर्याच दिवशी शस्त्रे खाली ठेवल्याने तो
तिसर्या दिवसाचा "ग्रॅंड व्हायव्हाचा तोफखाना" झेलायला आलाच नाही.त्यामुळे त्या दिवशी भिकूचा "डबा" नव्हता.
दुपारचे दोन वाजले होते.पोटात कावळे कोकलू लागले होते. परीक्षकांनी "निक्काल" लगेच सांगणार आहोत असे सांगीतल्याने रेसिडेंट मेसमधे जायचा प्रश्नच नव्हता. शेट्ट्याच्या "सी वाॅर्ड" मधे आम्ही तिघे परीक्षार्थी बन ऑम्लेट खात रात्रीच्या "सेलेब्रेशनची चर्चा" करीत बसलो होतो.
तेवढ्यात नारायण धावत-पळत कॅंटीनमधे वर्दी घेऊन आला व आमची वरात प्रॅक्टिकल हाॅलच्या दिशेने निघाली. अपेक्षेप्रमाणेच तिघेही पास झालो होतो.मला "हरी-मालिनी सुवर्णपदका" ची अपेक्षा होती.पण कर्नल आनंदच्या बायोकेमेस्ट्रीच्या प्रश्नांनी घात केला होता.ईथिलिन ग्लायकाॅलने माझी ठासली होती. हा हन्त हन्त !
रिझल्ट जाहीर होताच AFMC वाल्यांनी तिथेच "जल्लोष" सुरू केला.त्यांचे H.O.D. Dr.C.S.V.Subramaniyam व माझे आवडते Histopathologist Dr.A.K.Banarjee यांनी माझ्याकडे आज रात्रीच जंगी पार्टी झाली पाहिजे अशी मागणी केली.आनंदाच्या भरात मी हो म्हटले खरे,पण "नारायण" सावध होता.आमच्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटला विचारून सांगतो असे म्हणून त्याने मला वेळीच आवरले.ही पार्टी कधी,कुठे व कशी झाली ते पुढील लेखात !






Comments