"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १५"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १५"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारल्याने मी "पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण" ही लेखमाला लिहायला घेतली.त्यामुळे गोखले सर व माझा सहकारी सतीश पाटील या गटाला जोडले गेले.त्यामुळे दीर्घकाळ Hibernation मधे गेलेला B.J.Patho Meet हा गट बर्यापैकी Active झाला हे पाहून आनंद वाटला. आता बरेच जण लिहू लागतील अशी अपेक्षा करू या.मी तर "शिंग मोडून वासरां" मधे शिरायचे ठरविले आहे.
गोखले सर IAPM च्या चंदीगड परीषदेबद्दल लिहीणार असल्याने मी १९८२ च्या पांचगणीच्या MAPCON परीषदेबद्दल लिहीतो.जरूर वाचा.
आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे याच्यावर सर्व मदार सोपवून परीषदेचे अध्यक्ष डाॅ.आर.व्ही. अगरवालसर तसे निवांतच होते.फारच चिंताग्रस्त झाले की मधूनच दोन्ही हातांची बोटे डोक्यावरील केसात खुपसून "अरे भाई !" अशी विजाच्या नावाने डरकाळी फोडायचे.
त्या काळात पॅथाॅलाॅजी मायक्रोबायाॅलाॅजीचे विभाजन नुकतेच झालेले असल्याने दोन्ही विषयांच्या परीषदा एकत्रच होत असत.त्यामुळे भोरे,भोगे,नागधवणे ही मायक्रोबायाॅलाॅजीची मंडळी देखील परीषदेच्या संयोजनात सहभागी होती.
तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व बिनीचे शिलेदार मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले.त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे, नागधवणे,भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो.पुढे काय झाले ते पुढील लेखात जरूर वाचा.






Comments