top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग २०"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग २०"

©दिलीप वाणी,पुणे

या लेखात मी १९८२ च्या महाबळेश्वरच्या MAPCON परीषदेबद्दल माहिती सांगतो.जरूर वाचा.तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व "बिनीचे शिलेदार" मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले. त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे,नागधवणे, भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो. आठ दिवस राबराब राबून निवास,भोजन,बॅंक्वे,ध्वनीक्षेपक, दृक-श्राव्य साधने अशा एक ना भाराभार सगळ्या व्यवस्था लावून झाल्या व परीषदेच्या दिवशी टाय घालून(कारण सूट नव्हता) स्वागतकक्षात हजर झालो.

मुंबईचे प्रतिनिधी बसेस करून आले होते.त्यामुळे भसकन गर्दी झाली व आमची एकच "हबेलहंडी" उडाली.आधीचे "लिंबू-टिंबू" कार्यक्रम झाले व अकरा वाजता डाॅ.मनोहर घारपुरे सरांचा Key note address सुरू झाला.विषय होता "Funs & Fictions in Pathology Practice" ! सर्वांची हसता हसता मुरकुंडी वळाली.

फुकटात Pregnancy test करून घेणार्‍या महिला,रिपोर्ट हातात मिळाली की त्यात आधी रक्तगट शोधणारे रुग्ण,असे पुस्तकांमधे नसलेले पण प्रॅक्टिसमधे पदोपदी घडणारे किस्से सांगून सरांनी सर्वांना खूपच हसवले होते.या व्याख्यानाची पुस्तिका सरांनी सर्वांना वाटली होती.प्रॅक्टिस करताना या पुस्तिकेची मी अनेकवेळा पारायणे केलेली आहेत.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page