top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ३"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ३"

©दिलीप वाणी,पुणे

"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !

पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा "नारायण" भुसावळचा विजय भंगाळे याने माझे सर्वात महत्वाचे काम केले ते म्हणजे या नवरदेवाच्या डोक्याला बाशिंग बांधले ! क्लार्क "एचकर" बाईला गूळ लावून विजा थेट डिपार्टमेंटच्या भांडारातच घुसला व अनेक मोडक्या तोडक्या मायक्रोस्कोप्सची "जुळवाजुळव" करून विजाने माझ्यासाठी चक्क एक मायक्रोस्कोप बांधून दिला.डिपार्टमधल्या द्रोणाचार्यांनी मला नाकारलेला असल्यामुळे विजाच माझा द्रोणाचार्य झाला होता.तो सांगेल ती पूर्वदिशा !

आठ दिवसातच OPD चे पूर्ण काम शिकून झाल्याने विजाने रोज संध्याकाळी काॅलेज सुटल्यानंतर Histopatology Reporting Room मधे रात्री दहा वाजेपर्यंत थांबण्याची आज्ञा केली.तो व सतीश पाटील तेथे रोज अभ्यास करायला व स्लाईड्स पहायला बसायचे.मी सुध्दा "र,त,ट,फ, करीत स्लाईड्स पाहू लागलो.नाही समजले तर मदतीला विजा होताच ! त्याने सरळ माझ्या समोर Ogilvi चा ठोकळा व Rabbit Normal Histology Tray ठेवला व म्हणाला बस आता रात्रभर खेळत ! ते अक्षरश: खरे ठरले.कधी पहाट उजाडायची ते कळायचेच नाही !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page