"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ७"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ७"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण म्हणजे विजय भंगाळेने मला मानेवर खडा ठेवून अभ्यास करायची सवय लावली. आमच्या शेवटच्या टर्ममधे तर मी व श्रीमंत अडसूळ घर-दार सोडून म्युझियममधेच मुक्कामाला होतो.उशाला ॲॅंडरसन घेऊन "टिंग टिंग सेमिनार" च्या टेबलवर झोपायचो.
आमची "खान-पान-करमणूक" अशा सर्व प्रकारच्या सुविधा विजय भंगाळे पुरवत असे.त्याचे गोदरेजचे कपाट खारे शेंगदाणे, शेव,चिवडा,भडंग,फरसाण,मुग डाळ अशा नाना प्रकारांनी सदैव काठोकाठ भरलेले असायचे.एवढेच नव्हे तर सिगारेटस् व मसाला सुपारी असे "चोजले" देखील विजा पुरवित असे.
मंजिरी वाकनीस व भिकन सोनावणे यांनी घरगुती कारणास्तव परीक्षेला न बसण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता. त्यामुळे डिपार्टमेंटची सर्व मदार अडसूळ व माझ्यावरच होती.त्यामुळेच आमचा हा जीवाचा आटापिटा चालू होता.






Comments