"रिटायरमेंट - हिसाब अपना अपना - भाग २"
- dileepbw
- Dec 3, 2023
- 1 min read
"रिटायरमेंट - हिसाब अपना अपना - भाग २"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या बॅचने पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्याच नव्हे तर आपल्या महाविद्यालयाबाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.सर्वांचे अभिनंदन !
या वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनातील परीचयाच्या कार्यक्रमात बालरोगतज्ञ "जगदीश ढेकणे" याने व्यक्त केलेले मनोगत माझ्या मनाला फारच भावले.काय म्हणाला तो "निवृत्ती" बद्दल ? निवृत्तीचा विचार सुध्दा माझ्या मनाला शिवत नाही. हॅटस् ऑफ !
धर्मेंद्र आता ८७ वर्षांचे झाले आहेत. १९६० पासून ते आजपर्यंत त्यांनी ३०६ चित्रपटात काम केलं आहे असं असूनही त्यांना अजून काम करायचे आहे. ह्याच वर्षी त्यांनी 'राॅकी और रानी की प्रेमकहाणी' हा करण जोहरचा चित्रपट केला तर दुसरीकडे 'ताज' नावाची एक वेब सिरीज ही केली. आता त्यांच्या दोन्ही मुलांच्या करियरने पुन्हा गती पकडली आहे असं दिसतं. तेव्हा बापलेकांचा 'अपने-३' हा चित्रपट आला तर आश्चर्य वाटायला नको.
मी देखील सध्या जनकल्याण रक्तपेढी परिवाराचा "राष्ट्रीय अध्यक्ष" म्हणून "आयुष्याची शेवटची इनिंग" खेळत आहे. सध्या "थॅलेसेमिया निवारण" या मिशनवर आहे.त्यासाठी व्यापक जनजागृती,अद्ययावत माहितीचे वाचन,संकलन व प्रसारण,निधी संकलन अशी विविध कार्ये करण्यात व्यस्त आहे.सध्या थॅलेसेमियाच्या उपचारांसाठी "जीन थेरपी" चा अभ्यास करतो आहे.त्यासाठी PGI चंदीगडच्या संपर्कात आहे.(https://m.facebook.com/groups/564798883663480/permalink/998162230327141/?mibextid=Nif5oz)
सध्या आपल्या गटावर "Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats (CRISPR)" ही "अत्याधुनिक लेखमाला" लिहीत आहेत.
आजच थॅलेसेमिया निवारणाकरिता करीत असलेल्या निधी संकलनाची "लक्षपूर्ती" झालेली आहे.त्यामधे आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात भेटलेल्या प्रकाश चिरमाडेचा व बाळ सरवटे यांचा सिंहाचा वाटा आहे. अशाप्रकारे "आयुष्याची शेवटची इनिंग" जोरदार चालू आहे.








Comments