top of page

"रिटायरमेंट - हिसाब अपना अपना - भाग ३"

  • dileepbw
  • Dec 3, 2023
  • 1 min read

"रिटायरमेंट - हिसाब अपना अपना - भाग ३"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या बॅचने पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्याच नव्हे तर आपल्या महाविद्यालयाबाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.सर्वांचे अभिनंदन !

आजची शिरीष पटवर्धनची "रोज एक ओवी - चित्तास टवटवी" या मालिकेतील "सार्थ ज्ञानेश्वरी" मधील "म्हणौनि अभ्यासासी कांही। सर्वथा दुष्कर नाही। या लागीं माझ्या ठायी। अभ्यासें मिळ।।११३।।(अर्थात अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच अशक्य - कठिण नाही. म्हणून माझ्या ठायी तू अभ्यासाने एकरूप हो.) ही ओवी वाचून माझा सध्या चालू असलेला "Gene Therapy for Thalassaemia" हा अभ्यास आठवला.कालची दीप्याच्या नंदुरबारची AFMC ची बातमी वाचली का सर्वांनी ? तेथे Sickle cell anaemia व Thalassaemia अत्याधुनिक संशोधन व उपचार केंद्र उभारले जाणार आहे.माझ्या अंदाजाने त्याची परिणिती "Gene Therapy" मधे व्हायला हरकत नाही.

नुकताच अनुपम खेर हा बहुगुणी अभिनेता ६८ वर्षांचा झाला आहे. ते अधून मधून लिहीत असतात सांगत असतात की, मला सिनेमात काम करायचे आहे पण हल्ली काम मिळत नाही. अनुपम खेर 'कुछ भी हो सकता है' हा आपला टिव्ही शो ही चालवतात. मोठमोठ्या सेलिब्रिटींनी त्यांच्या शो मध्ये हजेरी लावली आहे. अनुपम खेर ह्या वयात ही व्यस्त राहू इच्छितात.मग मी थॅलेसेमिया निवारणाच्या कार्यात स्वत:ला गुंतवून घेतले तर कुठे बिघडले ?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page