"व्हाट्सपची काठी"
- dileepbw
- Aug 31, 2023
- 2 min read
"व्हाट्सपची काठी"
"राजकारण व धर्मकारण" बाजूला ठेवले की "साठी नंतरची काठी" म्हणजे आजकालचे व्हाट्सपचा गट ! आमचा BJMC 1973 नावाचा १९७३ साली बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय,पुणे प्रवेशित डाॅक्टर्सचा "वर्गमित्रांचा गट" आहे.देशातच काय तर संपूर्ण जगभर पसरलेले हे विद्यार्थी कोविड काळात मिळालेल्या "सक्तीच्या विश्रांती" मुळे अनेक वर्षांच्या खंडानंतर "व्हाट्सप" मुळे एकत्र आले व "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलना" कडे वाटचाल करू लागले आहेत.या गटामधील "व्यक्ती आणि वल्ली" यांचा एका कवितेतून परीचय करून देतो.पहा यांची ओळख पटते का ?
तुमच्या व्हाट्सप गटात सुध्दा अशा "व्यक्ती आणि वल्ली" असतीलच.पहा सापडतात का !
"व्हाट्सपची काठी"
म्हातारपणी मिळाली
व्हाट्सपची काठी !
कपाळावरची मिटली
आपोआप आठी !!
वेळ कसा जातो आता
हेच कळत नाही !
वर्तमान पत्राच पान सुद्धा
हल्ली हलत नाही !
चहा पिताना लागतो
व्हाट्सप हाताखाली !
डाव्या बोटाने हलके हलके
मेसेज होतात वरखाली !
कुणाचा वाढदिवस आहे ?
कोण आजारी आहे ?
कोण चाललंय परदेशात
अन काय घडतंय देशात ?
कधी लताची जुनी गाणी तर
कधी स्टोरीटेल वरील
ना.सं इनामदार यांची राऊ कादंबरी!
बसल्या बसल्या डुलकी लागते
कधी एखादी गझल समोर येते !
टीव्ही वरच चॅनेल सुद्धा
हल्ली बदलत नाही
व्हाट्सप शिवाय आमचं
पान जरा सुद्धा हलत नाही !!
वय जरी होत चाललं
हातपाय जरी थोडे थकले !
तरी व्हाट्सपच्या औषधाने
मन मात्र रिलॅक्स झाले !!
आता फार काळजी करत नाही
आता चिडचिड सुद्धा होत नाही !
व्हाट्सप चा मित्र भेटल्या पासून
आता मनात सुद्धा रडत नाही !!
आनंदी कसे जगायचे याचे
आता कळले आहे तंत्र !!
व्हाट्सप च्या या जादूच्या
काठी ने दिला सुखाचा मंत्र !
काव्य-शास्त्र-विनोद चाले
तोपर्यंत गट माना डोले
राजकारण सुरू झाले
की अनेकांचे पारा चढे
चंदू उघड उघड मोदीभक्त
मन्मथ मात्र जवाहरभक्त
चंदूच्या गटात कोणीच नाही
मन्मथची पालखी मंगल वाही
आंबेडकरवाद्यांना संविधानाची क्षती
काशिनाथला वाटे जातीभेदाची भीती
जाती-पाती काटण्याची आरतीची नीती
पौराणिक वाद उकरणे उदयची रीती
सुनील,जया,टोपी सोडवती गणिती कोडी
उदय व मनजीत यांना भावती संगीत कोडी
साधूवाणी सहज सोडवी नसलीची कोडी
पण हिंदू धर्मावर लिहीताच टराटरा फाडी
भोईटेला असे देवाचे वेड
उदयची पडे देवावर रेड
चित्तेला असे भक्तीचे वेड
देवांच्या निवृत्तीचे आरतील वेध
चंद्र,सूर्य,ग्रह,तारे सुनील जाणे
"घोळाची भाजी" जयाच जाणे
पडद्याआडून प्रसन्न उदयला ताणे
मंगल,आरती,राधाकृष्ण ठुबेच जाणे
गटावरील "मौनीबाबा" खरे शहाणे
लांबूनच गटावरील मजा पहाणे
ना कशाचा खेद ना कशाची खंत
अंगठा दाखवायला ही नसे उसंत
निष्काम कर्म करीत राही कोणी
स्तुतीच्या कवडीचुंबकांना न पडे नाही
जनकल्याणार्थ लेखणी झिजवत राही
त्याची विरोधकांना पर्वाच नाही !






Comments