top of page

"सर्व वर्गभगिनींना राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"सर्व वर्गभगिनींना राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा"


आपल्या "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलना" साठी झटणार्‍या व न झटणार्‍या सर्व वर्गभगिनींना राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

विद्यार्थीदशेत "प्रेमाच्या गावा" ला न गेलेली आपली BJMC 1973 बॅच आज आपआपल्या घरी आपआपल्या पत्नीच्या प्रेमात न्हाऊन निघालेली आहे.आज राखीपौर्णिमेच्या दिवशी

वर्गभगिनींशी कुणाचेच अन्य काही नाते का जुळू शकले नाही

असा गमतीदार विचार मनात आला व खालील कविता सुचली.वाचा.

"शापित हो गंधर्व आम्ही"

शापित हो गंधर्व आम्ही

हीच अमुची लायकी

तुम्ही काहीही म्हणा

नव्हता एकही बायकी

कनिंगहॅम निघाला कनिंग

ग्रे ने बदलला केसांचा रंग

आम्ही सगळे अभ्यासात दंग

मग काय करील तो श्रीरंग ?

आम्ही सारेच गंधर्व शापित

तुंबड्या लावत बसलो नापित

मुली होत्या आमच्याच भारी

त्यामुळेच ज्येष्ठांनी केली स्वारी !

असे जरी अमुची मधुर वाणी

प्रणय कथा तरी अमुची विराणी

नुसतीच वाजली मनी पिपाणी

तरुणींना भासे आत्मा दिवाणी

ललना हृदय उमजे न काही

प्रेमात सारेच अंधजन आम्ही

ललना हृदय समजे न काही

त्यासाठी व्हावी हृदयाची लाही

प्रेमाचिये गावी हवे पक्के डोके

तिथे नाही चाले हो कच्चे मडके

कळण्यास हे आम्हाला परीक्षा नडे

मग गेले माझे वरातीमागून घोडे

प्रेमात नाही पाऊल चुकीचे पडले

नाही हो निघाले कधी वाभाडे

शिक्षणसमयी शिक्षण हो घडले

प्रणयात कधीही नाही हो पडले

मनी वसे योग्य पाऊल प्रेमाचे

वाटले करी कल्याण जीवनाचे

कळले महत्व योग्य निर्णयाचे

ठरे तेव्हाच ठरे शुभमंगलाचे

पुन्हा एकदा सर्व वर्गभगिनींना राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page