top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १२"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १२"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

आपण सर्वांनी सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात आठवणीने सुभाषचा वाढदिवस केक कापून सामूहिक पध्दतीने साजरा केला व त्याने देखील सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून सर्वांना आपल्या वाढदिवसाची "चिरंतन आठवण" म्हणून "फोटोफ्रेम" भेट दिली.आपल्या सर्वांतर्फे त्याला मन:पूर्वक धन्यवाद !

राज मोतीवाला सारख्या एका असामान्य बुध्दीमान लाभलेल्या व्यक्तीसमवेत वाढदिवस साजरा करायला मिळणे

हा एक अवर्णनीय आनंद ! राज मित्रांसमवेत किती खुलतो,

मोकळा होतो हे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पहायला मिळाले.हे सामर्थ्य निखळ व निरपेक्ष मैत्रीचे ! असे "मैत्र" जपणे हेच तर गुपित निरामय दिर्घायुष्याचे !

UG असताना माझ्या तसेच अनेकांच्या मनात राज मोतीवाला बद्दल फारच कुतुहल असायचे ! आदरयुक्त भीती देखील असायची.तो "M" तर मी "W" ! अक्षरे "उलटी" तसेच आमचे स्वभाव देखील "उलटे" ! त्यामुळे "रोलकाॅल" मधे जसे आमच्यात "मैलाचे अंतर" तसेच ते "वर्तनात" देखील ! '"अभ्यास एके अभ्यास" एवढाच राजचा धंदा ! तर "नाना धंदे" हाच माझा धंदा !

त्यामुळे पहिल्याच दिवशी दुपारच्या सत्रात झालेल्या परीचयाच्या कार्यक्रमात मला चांगलेच "आवरते" घ्यावे लागले होते. आता सवडीने खुशाल वाचा E-Directory मधे माझे "नाना धंदे" ! तो पर्यंत राजचा "शाॅर्ट बट स्वीट" परीचय करून घ्या !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page