top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १८"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १८"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

आरतीच्या आदेशानुसार "ट्रॅडीशनल ड्रेस" घालूनच फोटो काढायला यायचे असल्याने पत्नीनेच ठरवलेला तिचा आवडता "अमर प्रेम" मधे राजेश खन्ना व "देवदास" मधे चुन्नीबाबू यांनी घातलेला "बंगाली धोतर-कुर्ता" माझ्या पेटीत भरला होता.तो नेसता नेसता माझी चांगलीच दमछाक झाली.त्यात घरगुती अपघातात माझे हात-पाय मोडलेले. एका हाताने मी तरी काय काय करणार ? शेवटी उप्या साठेनेच पायमोजे माझ्या पायात चढवले.या गडबडीत राज मोतीवाला व सुभाष सुराणा यांच्या वाढदिवसाचा केक कापायचाच राहून गेला.असो.

आज देवीदास चित्तेने व दीप्या अंधारेने सांगीतल्यावर हा गुप्तपणे ठरलेला पण सार्वजनिकरित्या साजरा झालेला कार्यक्रम कळाला.हा हंत हंत ! यावर सुभाषची मिश्किल प्रतिक्रिया वाचली.खरे आहे ! माझे धोतर मलाच आवरेनासे झाले होते.पण करणार काय ? बाल हट्ट,राज हट्ट तसेच स्त्री हट्ट यापुढे भल्याभल्यांची डाळ शिजलेली नाही,तेथे म्या पामराची काय कथा !

शेवटी "रात्रीस खेळ चाले" या मालिकेतील "अण्णा

नाईका" चे स्मरण करून एका हाताने "धोतराचा सोगा" पकडून "मी टाकी उपानह,पदे अति मंद ठेवी" अशा चालीने फोटो काढायला हजर झालो.तो पर्यंत हा "सरप्राईज आयटेम" संपन्न झाला होता.असो.

माझी ही अवघडलेली अवस्था पहिल्या रांगेत बसून खुर्च्या उबवणार्‍या बारा महिलांनी अचूकपणे टिपली व मला पुणेरी टोमणा मारलाच ! "जरा जपून चाल रे चोरा,परत पाय मोडून घेशील रे पोरा !"

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page