"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाने मला काय दिले ? "मैत्र" म्हणजे काय व त्याची "महती" काय ? हे या स्नेहसंमेलनातून मी शिकलो.राजीव मोतीवाला हा असामान्य विद्यार्थी "BJMC-1973 Batch" चा "स्टार" ! त्या काळात विक्रमी गुण प्राप्त करून SSC बोर्डाच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेला, निसर्गाकडून बुध्दीचे अप्रतिम वरदान मिळालेला विद्यार्थी ! आर.सी.एम.गुजराती विद्यालयातील गुजराती माध्यमातून बालशिक्षण घेतलेला हा विद्यार्थी उच्च मराठी माध्यम असलेल्या नू.म.वि.चा विद्यार्थी होतो काय अन् SSC बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात देखील शाळेत सर्वप्रथम येतो काय हे सर्वच मला तरी अनाकलनीय ! "प्री-प्रोफेशनल" ही जीवनातली एक महत्वाची परीक्षा ! त्या परीक्षेत "A" group घेऊन "IIT ian" व्हायचे स्वप्न पहाणार्या या असामान्य बुध्दीच्या विद्यार्थीचे सहा महिन्यात "मतपरिवर्तन" होते काय अन् नंतर "B group" घेऊन देखील पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येतो काय ! सारेच अनाकलनीय ! अशा या "अतिविशिष्ट व्यक्ती" ने Final MBBS च्या परीक्षेत घेतलेला "ड्राॅप" आधीच त्याच्या भोवती असलेल्या "गूढतेच्या वलया" त भर घालणाराच होता ! ॲनाटाॅमीच्या प्राध्यापिका मा.डाॅ.लता मेहता यांच्या प्रत्येक व्याख्यानात त्याचे कौतुक असायचे ! त्यामुळे माझ्या मनात आधीच त्याच्याबद्दल असलेल्या गुढतेत भरच पडत गेली.
या "गूढतेचा भेद" या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात झाला व "मैत्र" ही भावना किती श्रेष्ठ असते याची प्रचिती आली. Neurologist म्हणून "आंतरराष्ट्रीय संशोधक" अशी ख्याती प्राप्त झालेल्या या वर्गमित्राला सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात आमच्या समवेत भान हरपून नृत्य करताना पाहून डोळ्याचे अक्षरश: पारणेच फिटले ! सुदामाघरी श्रीकृष्ण रंगला !






Comments