top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २३"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २३"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

आरती व प्रतिमा हे स्नेहसंमेलनाच्या "मनोरंजन विभागा" चे "जय-विजय" नावाचे दोन बुरूज ! माझा इंग्लंड मधला मुक्काम सुरू असतानाच आरतीने आवाहन केले की मनोरंजन विभागाला "फिशपाॅंड्स" ची आवश्यकता आहे. तातडीने शंभर "फिशपाॅंड्स" तयार करून प्रतिमाकडे पाठवले.

नंतर तिचा निरोप आला की हा "फिशपाॅंड" ठेवू कुठे ? त्याच्यासाठी जागाच नाही. मग मी म्हटले माझ्याकडे जागाच जागा आहे ! मग त्याचे "पाच-पाच" चे गुच्छ तयार केले व "कोडी" म्हणून गटावर पाठवले.मजा आली की नाही ?

त्यानंतर "लेट लतीफ" मनजीतची "तबला वादना" साठी वेळ द्या अशी विनंती आली.मी त्याला म्हटले घरीच रेकाॅर्ड कर व आपल्या गटावर त्याचा VDO टाक ! पण त्याने ऐकले नाही.हट्ट केला.मुंबईहून उरापोटी "तबला-डग्गा" वाहून आणला.

लोणावळ्याच्या "सर्द" हवामानात तबल्याचे कातडे पडले ढिल्ले ! तशातच वारुणीमुळे तबला वादक पण पडला ढिल्ला ! "आधीच मर्कट त्यात मद्य प्याला" अशी झाली अवस्था ! दीपालीने कशीबशी केली आसन व्यवस्था ! आसारामही धावला मदतीला ! मन्याने माईक पेलला ! पण सभा होईना शांत ! मग मनजीत झाला बेफाम ! केले इंग्रजीत आवाहन ! कुणीच कुणाचे ऐकेना ! मनजीत जागचा हलेना ! शेवटी पळवला माईक ! मनजीत झाला उदास ! केला फार प्रयास ! वारूणीस नसे पर्याय ! करी शांत त्याच्या त्रस्त आत्म्यास


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page