"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २८"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २८"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
हे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन "वैशिष्ट्यपूर्ण" व्हावे म्हणून अनेक जणांनी अनेक बाजूंनी विचार करून शेवटी धंदेवाईक ऑर्केस्ट्रापेक्षा आपल्याच वर्गमित्र-मैत्रिणींनाच गायनाची संधी द्यायची व त्यासाठी भाड्याने "कराओके सिस्टिम" आणायचा निर्णय घेण्यात आवा.त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.सर्वांचे सर्वांतर्फे मनापासून आभार !
दीपक अंधारे नंदुरबारच्या हौशी कलाकारांच्या ऑर्केस्ट्रामधे अनेक वर्षे गात असल्याने शुभारंभाचे गीत त्यानेच गायचे असे ठरले.खरे तर त्याची नंदुरबारचा संपूर्ण ऑर्केस्ट्रा आणायची तयारी होती.पण मग इतरांची संधी गेली नसती का ? दीप्याने ऑर्केस्ट्राचा "धंदेवाईक पोशाख"करून व "धंदेवाईक एंट्री" मारून एकच धमाल आणली.त्याने गाणे देखील छान निवडले होते.ऐका !
पुकारता चला हूँ मैं गली-गली बहार की
बस एक छाँव ज़ुल्फ़ की बस एक निग़ाह प्यार की
ये दिल्लगी ये शोखियाँ सलाम की
यहीं तो बात हो रही है काम की
कोई तो मुड़ के देख लेगा इस तरफ़
कोई नज़र तो होगी मेरे नाम की
सुनी मेरी सदा तो किस यक़ीन से
घटा उतर के आ गई ज़मीन पे
रही यही लगन तो ऐ दिल-ये-
जवां असर भी हो रहेगा एक हसीन
विश्वजीत-आशा पारेखवर चित्रित झालेले हे बहारदार गाणे दीप्याने एकदम अप्रतिम सादर केले व "माहौल" तयार केला.धन्यवाद दीप्या !






Comments