"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३१"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 2 min read
Updated: Dec 4, 2023
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३१"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
आता उपस्थितांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.मी संयोजन समितीचा सदस्य असल्याने सर्वात शेवटी प्रतिक्रिया देईन.कारण मी चांगले झाले म्हटले तर "आत्मस्तुती" चा दोष लागेल व मी वाईट झाले म्हटले तर आत्मनिंदेचे पाप लागेल.सगळे राबराब राबलेले आहेत हे प्रामाणिकपणे सांगतो.कुणीही आपल्या तन,मन,धनाची फिकीर केलेली नाही.जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी नेमून दिलेला कार्यभाग पार पाडतच होते.माझ्याकडे मुख्यत: पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचे संपूर्ण सहकार्य मिळवण्याची जबाबदारी होती.ती मी ठीकठाक पार पाडली असे मला वाटते.तुम्हाला देखील तसेच वाटते आहे ना ? तसे वाटत नसल्यास व काही त्रुटी राहिली असल्यास मोठ्या मनाने माफ करा रे बाबांनो !
सर्व प्रथम प्रतिक्रिया बाळने काव्यातूनच व्यक्त केलेली आहे.
अशी पाखरे येती आणिक
स्मृती ठेवुनी जाती...
दोन दिसांची रंगत संगत
दोन दिसांची नाती...
अशी पाखरे येती. ...
दोन दिवसांचा आपला कार्यक्रम छान झाला.सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सर्व मित्रांच्या अक्षरशः ५० वर्षांनी गाठी भेटी झाल्या.सर्व कोअर कमिटी मेंबर्सनी अथक परिश्रम करून हे कार्य संपन्न केले.याबद्दल त्यांचे सर्वांचे विशेष कौतुक !
त्यानंतरची प्रतिक्रिया आहे सुभाषची ! काय म्हणतो तो ? वाचा.
अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा हे अतिशय विहंगम स्थळ आणि मित्र,मैत्रीणींचा जल्लोष ! खूपच नेटके संयोजन.ओळख ५० वर्षानंतर जास्तच मजबूत झाली.सगळी पाऊले थिरकली, मोठेपण,मैत्री पुढे गळून पडते,आणि मैत्रीची जादू,सर्वांना एका पातळीवर आणते.ही जादू भरभरून अनुभवता आली. सुरूची पूर्ण सुग्रास भोजन,खूपच काटेकोर प्रतिसाद मित्र, मैत्रीणींचा.अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरण.बै.जी.चे सर्व एका "उच्च" पातळीवर घेवून गेले.मुतालीक सर,आगाशे सरांचे वैचारीक प्रबोधन खूपच अनुकरणीय.आपला "स्काॅलरशिप फंड" सर्व मित्र,मैत्रीणींसाठी नेहमीच खुला.
आसारामचा तातडीचा प्रतिसाद प्रेरक ठरेल.प्रसन्नचे मनोगत प्रसन्न करणारे,तर नसलीचे भवनानां हात घालणारे.राजचे गुरुजनांचा आदर करणारे.दिवंगत मित्र, मैत्रीणींची आठवण ठेवीत आपण कार्यक्रम वेगळ्या सुवर्ण झळाळीने दिमाखदार झाला.
संजीव,नरेंद्र,अविनाश,आरती,नसली,आसाराम,बाळासाहेब यांचे परिश्रम आणि दिलीपची साथ ! मित्र,मैत्रीणींचा प्रतिसाद खूपच आनंदीत करीत राहीला.पाच वर्षात एकदा एक असे स्नेह संमेलन आणि दरवर्षी छोटे स्नेह संमेलनाला जमता यावे.दिपालींचे नेटके संयोजन भावले.चला सारे रीचार्ज झाले.खूप, खूप समाधान !
अनेकांनी "औपचारिक" भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्या अधिक "दिलखुलास" असायला हव्यात ! पुणेरी "शालजोडी" दिलीत तरीही चालेल.पण काही तरी बोला !








Comments