top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३४"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 2 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३४"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

BJMC-1973 Batch" चे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन "वैशिष्ट्यपूर्ण" व्हावे व "मातृऋण" काही अंशी फिटावे यासाठी बराच विचार करून शेवटी आर्थिक दैन्याचे चटके भोगलेल्या दीप्या अंधारेने सुचविलेली "गरजू विद्यार्थ्यांना वस्तुरूप शिष्यवृत्ती" ही योजना सर्वांनाच भावली.

ही योजना जनसामान्यांना देखील कळावी व त्यांचा सहभाग या "जगन्नाथाच्या रथ" ओढण्यात लाभावा अशी कल्पना माझ्या मनात आली व मी एक आवाहनात्मक नोट खालील प्रमाणे तयार करून माझ्या ओळखीच्या वार्ताहरांकडे पाठवली.

त्याला उत्तम प्रतिसाद मिळताच मी सर्वांनाच स्थानिक वार्ताहरांना हेच आवाहन प्रसृत करायला प्रवृत्त केले.त्याला सुभाष व मन्मथने चांगला प्रतिसाद दिला व या आवाहनाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चांगलीच प्रसिध्दी मिळाली. दोघांनाही मन:पूर्वक धन्यवाद !

पुण्यात सकाळ,टाईम्स व इंडीयन एक्सप्रेसने दखल घेतली.जरूर वाचा.

आरती,सुभाष,प्रतिमा,अरविंद इ.वर्गमित्रांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे.त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद !

"बैरामजी जीजीभाॅय वैद्यकीय महाविद्यालय,पुणेच्या १९७३ तुकडीचे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन"

बैरामजी जीजीभाॅय वैद्यकीय महाविद्यालय,पुणेच्या १९७३ तुकडीचे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन रविवार दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले असून महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता मा.डाॅ.शेखर प्रधान यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व स्मरणिका प्रकाशन होणार असून सुप्रसिध्द अभिनेते व मनोविकारतज्ञ डाॅ.मोहन आगाशे त्यांच्या या १९७३ तुकडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनानिमित्त १९७३ तुकडीच्या विद्यार्थ्यांनी रू.बारा लाखाची देणगी महाविद्यालयाकडे सूपूर्त केली असून त्याचा विनियोग गरजवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी "टॅब्लेट" वितरण केले जाणार आहे.या निधीमधे दिवसेंदिवस भर पडत जावी या उद्देशाने सर्वांना आपल्या स्वत:च्या तसेच लग्नाच्या वाढदिवशी देणगी देता यावी अशी सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.या निधीच्या व्याजातून दरवर्षी काही

गरजवंत विद्यार्थ्यांना "टॅब्लेट" चे वितरण केले जाणार आहे.

दिवंगत मित्रांना श्रध्दांजली,गुरुजनांचे स्मरण,बी.जे.चे स्वागतगीत,जुन्या फोटोंच्या माध्यमातून बी.जे. तेव्हाचे व बी.जे. आत्ताचे हे स्मरणरंजन,इ-डिरेक्टरी व स्मरणिकेचे प्रकाशन,BJMC 1973 Batch Scholarship" चा शुभारंभ व "टॅब्लेटस्"चे वितरण असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची इतिश्री काॅलेज कॅंटीनमधे सुग्रास भोजन समारंभाने होणार असून त्यानंतर ज्यांना रस असेल अशांसाठी मातृसंस्था व वसतीगृह यांना भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

डाॅ.दिलीप वाणी

राष्ट्रीय अध्यक्ष

जनकल्याण रक्तपेढी परिवार,भारत

या आवाहनाचे इंग्रजी भाषांतर करून द्या अशी विनंती TOI ने केल्यामुळे त्यांना खालील नोट पाठवली:-

"B.J.Medical College,1973 Batch" celebrates Golden Jubilee"

"B.J.Medical College,1973 Batch" celebrates its Golden Jubilee on Sunday,November,2023 by launching a scholarship for the needy students of this college in the auspicious hands of the Dean Dr.Shekhar Pradhan. Renowned actor & Prof.of Psychiatry of this BJMC 1973 batch Dr.Mohan Agashe is going to bless this occasion.

The past students of "B.J.Medical College, 1973 Batch" have presently raised a donation of Rs.12 lacs to distribute "Tablets" to the poor & needy students of this college.The donation will be replenished every year to make it a permanent activity of the "BJMC 1973 batch".

On this occasion homage will be paid to the late students & teachers of BJMC 1973 batch.

Old memories will be refreshed through old college days photographs.An E-directory cum Souvenir will be released on this occasion.A conducted tour of the Alma Mater is arranged to watch the new developments in the B.J. Medical College & Sassoon General Hospitals.

The program will be followed by a lunch in the college canteen which would be a nostalgic event.

Prof.Dr.Dileep Wani

National President

Janakalyan Chain of Blood Banks

India

या प्रयत्नांना चांगले यश मिळाले.आपण सर्वांनीच हे आवाहन आपाआपल्या ठिकाणच्या स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसृत केल्यास "BJMC-1973 Batch Scholarship" साठी निधीसंकलन करणे सुलभ होईल अशी आशा वाटते. पहा प्रयत्न करून !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page