""सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३७"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 3 min read
""सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३७"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
या स्नेहसंमेलनात शीला गोळे(शिंत्रे) यांनी गायलेले गाइड सिनेमातले "पिया तोसे नैना लागे रे" हे गाणे फारच अप्रतिम झाले.संगीत आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ते जुने असो वा नवे, भारतीय असो वा बाहेरचे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपट संगीत, त्यातील बारकावे जाणून घेण्याच्या "मधुकर वृत्ती" ने वारंवार ऐकत राहिल्यास कानसेन 'रसिक' होण्यास सुरुवात होते.
शीला गोळे(शिंत्रे) यांनी गायलेल्या "पिया तोसे नैना लागे रे" या गाण्याचा रसास्वाद अनेक अंगांनी घेता येतो.हे गाणे गाताना लता मंगेशकर 'पिया तोसे' नंतर थोड्या थांबल्या आहेत.त्यावेळी वेगवेगळी वाद्ये वाजलेली आहेत.एका पॉझनंतर झायलोफोन - सतार,तर दुसऱ्या पॉझनंतर तबला वाजतो.सात मात्रांच्या रूपकचे चौदा मात्रांच्या दीपचंदीमध्ये रूपांतर झाल्यानंतर,रंगपंचमीच्या पिचकारीचा आवाज बर्जोर उर्फ "बजी लॉर्ड" यांनी झायलोफोन मधून काढला आहे.
शीला गोळे(शिंत्रे) यांनी गायलेल्या "पिया तोसे नैना लागे रे" या गाण्याचा गीतकार म्हणजे पाकिस्तानातील रावळपिंडी येथे एका "चर्मकार" कुटूंबात जन्मलेले श्री.शंकरदास केसरीलाल ऊर्फ "शैलेंद्र" ! त्यांनी तीन वेळा फ़िल्मफ़ेयर पुरस्कार जिंकत "सब कुछ सीखा हमने...', 'रमैया वस्तावैया...', 'मेरा जूता है जापानी...' अशी एकाहून एक अप्रतिम गाणी रचली.त्यांनी राजकपूर व वहीदा रहमान यांना सोबत घेऊन 'तीसरी कसम' हा सिनेमा निर्नाण केला.‘होठों पर सच्चाई रहती है, दिल में सफाई रहती है', 'मेरा जूता है जापानी,' ‘आज फिर जीने की तमन्ना है’, "आवारा हूॅं" अशी डझनावारी "यादगार फ़िल्मी गीते" त्यांनी लिहिली.
शैलेंद्र हे महान अभिनेता व फ़िल्म निर्माता "राज कपूर" यांचा "आतला आवाज" होते.माटुंगा येथे रेल्वेची नोकरी करताना एका कविसंमेलनात त्यांना श्री.राज कपूर यांनी हेरले व सिनेसृष्टीत आणले. महाविद्यालयीन जीवनापासूनच काव्य स्पर्धांमधे पारितोषिके पटकावणारे "शैलेंद्र" सिनेसृष्टीत चांगलेच चमकले.घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती दूर करण्यासाठी त्यांनी भरपावसात भिजत R.K.Studio गाठला व ‘बरसात में तुम से मिले हम सनम’ हे गीत रचले.ते ऐकून श्री.राज कपूर एवढे खूष झाले की त्यांनी पन्नास हज़ार रूपये मेहनताना देऊन श्री.शैलेन्द्र यांच्याकडून "बरसात" सिनेमाची सर्वच्या सर्व दहा गाणी लिहून घेतली.सर्व गाणी इतकी गाजली की नंतर श्री.शैलेन्द्र यांना मागे वळून पहावेच लागले नाही.
साध्या,सरळ,सोप्या शब्दात भावना उलगडून दाखवणे हे श्री.शैलेन्द्र यांचे वैशिष्ट्य होते.त्यामुळेच 'किसी के आँसुओं में मुस्कुराने' असा विचार केवळ शैलेन्द्र सारखा संवेदनशील गीतकारच करू शकतो.अशी आणखी काही उदाहरणे देतो.
१.“कल तेरे सपने पराये भी होंगे, लेकिन झलक मेरी आँखों में होगी
फूलों की डोली में होगी तू रुख़सत, लेकिन महक मेरी साँसों में होगी…..”
२.“सहज है सीधी राह पे चलना, देख के उलझन, बच के निकलना कोई ये चाहे माने न माने, बहुत है मुश्किल गिर के संभलना…..”
३.“मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी
सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी…..”
४.“तन सौंप दिया, मन सौंप दिया, कुछ और तो मेरे पास नहीं
जो तुम से है मेरे हमदम, भगवान से भी वो आस नहीं…..”
५.आवारा हूँआवारा,रमैया वस्तावैयादिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,मेरा जूता है जापानी,आज फिर जीने की,गाता रहे मेरा दिल,पिया तोसे नैना लागे रे,खोया खोया चांद,हर दिल जो प्यार करेगा,दोस्त दोस्त ना रहा,सब कुछ सीखा हमने,किसी की मुस्कराहटों पे,दिल की नज़र से,अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम अशी किती गाणी सांगायची ?
६.त्यांच्या 'ये मेरा दीवानापन है,'सब कुछ सीखा हमने' व 'मै गाऊं तुम सो जाओ' या तीन गीतांना तीन फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाले होते.
७.शैलेंद्र यांच्या 'तीसरी क़सम' या सिनेमाने त्यांना आर्थिक डबघाईला आणले.ते कर्जबाजारी झाले. आजारी पडले. ‘जाने कहां गए वो दिन, कहते थे तेरी याद में, नजरों को हम बिछायेंगे’ हे गीत लिहिता लिहिताच त्यांचा मृत्यू ओढवला. पण दैवाचा खेळ कसा विचित्र कसा ते पहा.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा 'तीसरी क़सम' हा सिनेमा अत्यंत लोकप्रिय झाला. जणू काही त्यांचेच गीत त्यांनाच सांगत होते :-
“ओ जाने वाले हो सके तो लौट के आना…..”
शीला गोळे(शिंत्रे) यांनी गायलेल्या "पिया तोसे नैना लागे रे" या गाण्याचा रसास्वाद घेता घेता मी इतक्या आठवणींमधे बुडून गेलो होतो.






Comments