top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३९"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३९"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे सचित्र वृत्त पाहून ज्यांना काही कारणास्तव येता आले नाही ते आता हळहळ व्यक्त करू लागले आहेत.काळजी करू नका.आपण "हीरक महोत्सव" साजरा करू या.

आज मोहना निजसुरेने(सरंजामे) तिच्या अनुपस्थितीबाबत आपली "हळहळ" व्यक्त केली आहे व कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल व्यवस्थापकीय समितीचे मनापासून कौतुक केले आहे.दत्तु दरंदळेने पण तिची "री" अढली आहे.

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा आढावा घेताना सुभाषने त्याच्या प्रसववेदनांपासून सुरूवात करून वेळोवेळी झालेल्या रणकंदनावर व त्यामुळे गमावलेल्या चारू साठेच्या गमनावर प्रकाश टाकलेला आहे.चारूचा कमी वर्गणीसाठी आग्रह,

नसलीचा अवांतर खर्चाला विरोध,विनायकचा कटूता निर्माण करणारा कडवा विरोध,नरेंद्र पटवर्धनचा काली प्रसंगी दुखावणारा रोखठोकपणा,अविनाशची पडद्यामागे राहून सगळी मदत करण्याची वृत्ती,विवेकचा विवेकीपणा, नकारात्मकता कमी करण्यात असलेला नसलीचा पुढाकार, आसारामची कार्यतत्परता व आवर्जून सर्व सभांना उपस्थिती, जितेंद्रची on line उपस्थिती,आरती आणि संजीवची सर्वांना सवारायची व सांभाळून घेण्याची भूमिका,किशोरचा सडेतोड व्यवहरीकपणा,दिपकचा चोखंदळपणा अशा सर्व व्यक्ती आणि वल्ली सांभाळत व सर्व प्रकारची आंदोलने झेलत शेवटी कार्य सिध्दीस गेले.सुभाष व मी सर्वाला "मम" म्हणायचो.वादग्रस्त चर्चा टाळायचो.

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुण्यातील मंडळी खूपच धावली.सर्वांनी खूपच मेहनत घेतली आणि संस्मरणीय स्नेह संमेलनाला सर्वजण जमले.निवास व्यवस्थेचा विसार देण्यासाठी कोअर कमीटी सदस्यांनी प्रत्येकी रू.वीस हजार वर्गणी काढली.त्यामुळे स्थान निश्चिती झाली.दरडोई खर्च ठरला.सगळे यावेत म्हणून "कोअर कमिटी" सज्ज झाली.

संजीवने जबाबदारी दिली.मैत्रिणींसाठी आरती अथक मेहनत घेत राहीली.मित्रांना प्रवृत्त करण्यासाठी सारेजण एकवटले आणि श॔भरी गाठली.कार्यक्रमासाठी व्यवस्थापक नेमावा की नाही ? यावरही भरपूर चर्चा झाली.व्यवस्थापक किती गरजेचा ते आपण सर्वांनीच पाहिले आणि त्यामुळेच सर्व काही नेटके झाले.व्यवस्थापक दिपालीचे मनापासून कौतुक करायलाच हवे.

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे कार्यस्थळ निश्चित करायला

संजीव,नरेंद्र,विनायक,अविनाश समक्ष गेले.। सारं ठरविले.

किती नेटके,सुंदर आणि तृप्त करणारे झालै हे आपण अनुभवले.सलाम या सर्व दोस्तांना !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page