top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४४"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४४"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा आढावा आता अनेक जण वाचू लागले आहेत.ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.दत्तू, मनजीत,मंगलप्रभा,रविद्र,अलका यांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहेत.तर पक्याने माझं वार्तांकन खुसखुशीत, रोचक,रंजक,संस्मरणीय आणि संग्राह्य आहे असे खाजगीत सांगीतले आहे व "लगे रहो मेरे दोस्त" अशा शब्दात मला लिहायला उत्साह दिला आहे.जयाने तर सर्वांना परस्पर बक्षीसे देखील वाटून टाकली आहेत.

सुभाषने सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची सुकाणू समिती, स्नेहसंमेलनाचा,E Directory.Directory चा व देणगीचा

वेगळा गट कसा कार्यरत होता याची माहिती दिली आहे.

Google form भरून घेण्यासाठी संजीव,आरती, बाळासाहेब,आसाराम,गोरखनाथ आणि सुभाष यांनी सतत पाठपुरावा करून सर्वांची माहीती संकलित केली.इव्हेंट मॅनेजर सौ.दिपाली सक्रिय झाल्या.आरतीने PPT चे शिवधनुष्य लिलया पेलले.दिवंगत मित्र आणि मैत्रिणींच्या माहीती चे संकलन बाळासाहेब आणि गोरखनाथ यांनी केले.

E Directory आणि Souvenir चे कार्य आरतीच्या मदतीने संजीव सोबत चर्चा होवून राहूल यांचेवर सोपविले.

स्नेहसंमेलन स्थळाच्या(अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा) च्या आयोजनचा जगन्नाथाचा रथ नरेंद्र,संजीव,आरती,विनायक, यांनी इव्हेंट मॅनेजर सौ.दिपालीला सोबत घेवून लिलया पेलला.

बै.जी.काॅलेजसाठी नसली,नरेंद्र,संजीव,आसाराम,अविनाश यांनी कंबर कसली.डोनेशन गट तयार झाला.अनेक मिटींग्ज, खूप चर्चा हे मंथन शेवटी अमृतच घेवून आले !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page