"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४६"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४६"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा एक भाग म्हणजे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय या आपल्या "मातृसंस्थे" ला भेट ! कुणाकुणाला काय कायआढळले ? वाचा.
१,प्रकाश चिरमाडे :- वसतीगृहाची अवस्था फारच वाईट आहे.एका खोलीत दोनच्या जागी चार विद्यार्थी कोंबले आहेत.कपडे वाळत घालायला व्हरांडा वापरला जातो. त्यामुळे वातावरण गलिच्छ होते.बाग व कारंजे नष्ट केले आहे.इमारतींचे प्लास्टर जागोजागी उखडल्यामुळे सर्वत्र रंग उडालेला आहे.त्यामुळे सर्वत्र "भकास" वातावरण आहे.कोण म्हणेल याला वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतीगृह ?
२.उत्तम भोईटे व रतनानी :- सुधारणा आहे,पण डीन साहेबांनी जेवढे कौतुक केले तशी नाही.
३.जया तोडमल(पाटील) :- चार पाच वर्षांपूर्वीपासूनच सगळी अवस्था वाईट आहे.बेंचेस तुटलेले,सगळे जुनाट व कळकटलेले !
४.किशोर बधे :- लोणी,प्रवरानगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तुलनेत आपली मातृसंस्था फारच भिकार !
किशाच्या मते "Shrude and clever people make programs or associations to help poor or needy and the so called intelligents hand over their money to them."
लेडीज रूममधेपण स्वच्छता नाही.डबा खायची जागा फारच अस्वच्छ !
५,शांताराम गोसावी :- आपल्या वेळचा कॉलेजचा अवतार आणि आत्ताचा अवतार यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे.तेव्हा ते "राजेशाही" वाटायचं ! आता त्याची "झोपडपट्टी" झाली आहे.
हे सुधारणार कसे व कधी ? मेडिकल काॅलेज विद्यार्थी संघटना प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द काही करू शकेल का ?






Comments