"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४८"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४८"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन कुठे असावे यावर महिनाभर वादळी चर्चा झाली.माझी दहा वर्षे वसतीगृहात गेलेली असल्याने प्रत्येकाच्या त्यावेळच्या आर्थिक स्थितीची मला इत्यंभूत कल्पना होती.त्यामुळे मी खूप खर्चिक हाॅटेलमधे स्नेहसंमेलन असू नये या मताचा होतो.पण बहुसंख्य मंडळी पंचतारांकित विचारांची असल्याने माझा नाईलाज झाला व मी महागड्या हाॅटेलला तयार झालो.असो.
पण जेव्हा "मातृसंस्थे" ला भेट द्यायचीच नाही हा विचार पंचतारांकित मंडळींनी मांडला तेव्हा मात्र मी रागावलो व संयोजन समितीमधून बाहेर पडण्याचा विचार सांगीतला. शेवटी काही जणांनी सहमती दाखवल्याने अखेर दुसर्या दिवशी मातृसंस्थे" ला भेट द्यायचे ठरले.त्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली.ती मी स्विकारली.कशाच्या भरवशावर ? वाचा.
चार वर्षांपूर्वी माझ्या अध्यक्षतेखाली भारती विद्यापीठात रक्तपेढीविज्ञानाची राष्ट्रीय परीषद आयोजित झाली होती. त्यावेळी मी पॅथाॅलाॅजीच्या सध्याच्या HOD डाॅ.नकाते यांना संयोजन समितीमधे सहभागी करून घेतले होते.गेले काही महिने त्यांची अत्याधुनिक रक्तपेढी उभारण्यासाठी मी मार्गदर्शन करीत होतो.त्यामुळे त्या चांगल्या संपर्कात होत्या. त्यामुळे त्यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल याची खात्री होती. तुम्ही सर्वांनी ते अनुभवलेले आहेच.कसे वाटले ?
आता प्रश्न होता तौ डीन साहेबांची परवानगी व आशिर्वाद मिळवण्याचा ! ते काम नसलीने केले.कारण दोघेही पूना क्लबचे जलतरणपटू ! आपल्या जळगावला इंटर्नशिप केलेल्या मित्रांचे RMO डाॅ.ठाकूर यांचे ते चिरंजीव ! बाळासाहेब घोंगाणे व अविनाश देशमुख हे आपले दोन वर्गमित्र दीर्घकाळ काॅलेज व ससून रूग्णालयात सेवा देत असल्याने त्यांची देखील मदत झाली.दुर्दैवाने डीन साहेबांना पदभार सोडावा लागला.पण त्यामुळे आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला काहीही बाधा आली नाही व ते निर्विघ्नपणे संपन्न झाले.






Comments