"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५"
- dileepbw
- Dec 1, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
या "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलना" तला "परीचया" चा कार्यक्रम अपेक्षापेक्षा जास्तच लांबला व "गृप फोटो" साठी "संध्याछाया" पसरली."परीचया" च्या कार्यक्रमातून एकमेकांच्या मनाच्या पटलावर उतरवलेली एकमेकांची "छबी" अखेर संध्याछायेत का होईना पण कागदावर अवतरली."रात्रीस खेळ चाले" या मालिकेतील "अण्णा नाईक" च्या अवतारातील माझी छबी पाहून माझेच मला हसू आले.असो.
बंड्याने पाठवलेला प्रमुख पाहुणे मा.डाॅ.मोहन आगाशे यांच्या भाषणातील एक "तुकडा" पाहून मला मी माझ्या परीचयाच्या वेळी सांगीतलेला माझ्या "चिरंजीवांचा किस्सा" आठवला. तुम्हाला आठवतो ? त्याला का बरे डाॅक्टर व्हायचे नव्हते ? कारण त्याला त्याची मुले "रोज" भेटायला हवी होती.माझ्या सारखी आठवड्यातून एकदा नाही ! मा.डाॅ.मोहन आगाशे याचे भाषण ऐकताना त्याचा हा "शालजोडी"तला "पुणेरी जोडा" आठवला.






Comments