top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५२"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५२"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे आमंत्रित "मावळे" डोंगरकुशीत वसलेल्या "अप्पर डेक रिसाॅर्ट,लोणावळा" येथे पोहोचले.सर्वांची "गळाभेट" झाली.ख्यालीखुशाली पुसून झाली.कॅमेर्‍यात छबी उतरवून झाली,तशी "पौटपूजे" ची आठवण झाली.सर्वजण एक साथ पंगतीला बसले.डेझर्टची चव मुखात घोळवत थोड्याशा वामकुक्षीसाठी व तत्पश्चात "पारंपारिक वेशभूषा" करण्यासाठी आपआपल्या तंबूत डेरेदाखल झाली.भर दुपारच्या कोवळ्या उन्हात गडाच्या माचीवर हजर होण्याचा हुकूम खलित्यात पावलेला असल्याने सर्व मावळे आपआपल्या बाराबंद्या व मावळणी आपआपल्या पैठणी व नथी सावरत लगबगीने माचीकडे रवाना झाल्या.कॅमेर्‍यातून फटाफटा सुटलेल्या गोळ्या सुहास्य वदनाने छातीवर झेलून मंडळी सजवलेल्या "दरबारा" कडे निघाली.तेथे काय घडले ते पुसता ? ऐका बखरकार सुभाष सुराणाच्याच तोंडून !

गणेश वंदना,

मैत्रीणीं फारच दिमाखात.

काय ते प्रतिभावान ओळख,

नव नवोन्मेष.

किती जिवलग भेटले.

वारूणी कांही जणांनी सोबत केली,

आम्ही चकण्याचे खारे दाणे.

नंतर मैफील रंगली,

सारे दंभ गळाले,

फक्त आणि फक्त मैत्री उरली,

आरतीने आणलेली "शॅपेन" फेसाळली.

नरेंद्रने भल्या पहाटे फोन केला,

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हे मैत्र, ही संपत्ती.

राज सोबत आणि या सागळ्या

स्नेहाच्या सोबत वाढदिवस,

हा परम आनंद सोहळा .

राज किती बदलला.

एक ग्रुप फोटो आणि नंतर धमाल.

गाणी आणि नाच एकच जल्लोष.

काय सांगू तुम्हाला,

आज आनंदी आनंद झाला.

हीच सगळ्यांची भावना.

जेथे सगळी पुटे गळतात,

तेथे मैत्री राहते.

हे बै.जी.ने दिले.

संजीव,नरेंद्र,आरती,तुम्हाला सलाम,

खूपच मेहनत .

दिपाली नेटके संयोजन.

भारावलेली अवस्था.

शब्द अपूरे.

रात्री बाॅन फायर.

मी तर रात्रभर झोपलो नाही.

फक्त recollect करीत होतो.

ठुबे साक्षीदार.

पहाटे पाऊस ही आला,

आनंद वाढवित राहीला.

सकाळी UD चा भोवताल देखणा.

सारं काही डोळ्यात साठविले.

आता स्वादिष्ट न्याहरी आणि

वेध बै.जी.चे, मातृसंस्थेचे !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page