
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५७"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५७"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
मंगलने सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनातील "उपस्थितीचा लेखाजोखा" घेतल्यामुळे आज १९७२ बॅचचे दुसर्या वर्षाला आपल्याबरोबर आलेल्या काही जणांची(परदेशी कंपनी व युवराज बाविसकर) अवस्था "एक तरफ हैं उनका घर एक तरफ है मयकदा" अशी असल्याचे लक्षात आले आहे.त्यांचे नागरिकत्व "दुहेरी" आहे.असो.जे कुठल्याही कारणास्तव आपल्या "BJMC-1973 Batch" बरोबर आलेले आहेत त्यांना सांभाळायलाच हवे.
मूळच्या २०० प्रवेशितांपैकी तीस जण आज हयात नाहीत. उरलेल्या १७० पैकी फक्त १४२ गटावर आहेत.असे का ? बाकीच्यांना आपण का बरे नकोसे झाले आहोत ? गटावरील "राजकारण व धर्मकारण" या विषयांवरील चर्चांमुळे ? पण त्यासाठी वेगळा गट स्थापन करून दिलेला आहेच ना ?
मंगल म्हणते काही मित्रांच्या मनात गटावरील धार्मिक चर्चांमुळे "भावनिक अंतर" पडलेले आहे.तसे असेल तर ते दूर करायलाच हवे.अशा मित्रांना देखील आपण आपल्यात सामावून घ्यायलाच हवे.कोणीही एकटे पडायला नको. गटावरील काही जण या कारणामुळे दुखावले गेले असावेत असे मंगलला वाटते आहे.त्यामुळे अशी चर्चा वेगळ्या गटात करावी.ही नम्र विनंती.
गटातील प्रत्येकाकडे काही ना काही विशेष गुण आहेत. त्यांनी या समूहात लिहीत रहावं ! त्यानेच विचारांची देवाण घेवाण होत रहाते.आपण आता आयुष्याच्या अशा टप्यावर आहोत की तेथे मिळून मिसळून रहाणे आवश्यक आहे. आयुष्याचे हे दिवस आनंदात जायला हवेत.
आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला उपस्थित राहून सर्वांनाच खूप छान वाटले.सर्वांना भेटून व सर्वांश बोलून खूप मजा आली."ये जिंदगी ना मिलेगी दोबारा ! ये दोस्त भी ना मिलेंगे दोबारा ! जीओ मगर खुशीसे !






Comments