top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६०"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 2 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६०"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनुपस्थित राहिलेल्या सर्वांनाच एक संदेश द्यावासा वाटतो.जरूर वाचा व गटावर नसलेल्या मित्रांना देखील कळवा.

"आयुष्य खूप छोटं आहे ! त्यामुळे उगाच भांडत बसू नका"

शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या.भूत होऊन जगण्यापेक्षा,माणूस म्हणून अजरामर व्हा.

आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका. डोक्यात राग भरल्यावर, फुटणार कसं हसू?

अहंकार बाळगू नका, भेटा बसा नि बोला. मेल्यावर रडण्यापेक्षा, निदान जिवंतपणी तरी बोला.

नातं आपलं कोणतं आहे, हे महत्वाचे नाही. प्रश्न आहे कधी तरी, गोड बोलतो की नाही?

चुका शोधत बसाल, तर सुख कधीच मिळणार नाही. चूक काय नि बरोबर काय, हे कधीच कळणार नाही.

काहीतरी खुसपट काढून, उगीच नका रुसू. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका.

चल निघ चालता हो, इथे थांबू नको. हात जोडून विनंती आहे, अशी भाषा वापरू नका.

दारात पाय नको ठेऊ, तोंड पाहणार नाही. खरं सांगा असं वागून, कोण सुखी होणार?

तू तिकडे आम्ही इकडे, म्हणणं खूप सोपं असतं. पोखरलेलं मन कधीच, सुखी होत नसतं.

सुखाचा आभास म्हणजे, खरं सुख नाही. आपलं माणूस आपलं नसणे, या सारखं दुसरं दुःखच नाही.

करमत नाही घरी म्हणून अश्रू गाळू नका. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका.

एक तर्फी प्रेम करून, उपयोग आहे का? समोरच्याला आपली आठवण, कधी तरी येते का?

नातं टिकलं पाहिजे, असं दोघांनाही वाटावं. कधी गायीने कधी वासराने, एकमेकाला चाटावं.

तुमची काहीच चूक नाही, असं कसं असेल? पारा शांत झाल्यावरच, सत्य काय ते दिसेल.

बघा जरा एकांतात, डोळे मिटून आत. चूक कबूल करतांना, जोडताल दोन्ही हात.

अंधारात अश्रू ढाळत खरंच बसू नका. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका.

दुसऱ्याला दोष देणं, खूप सोपं असतं. वेळ आल्यावर कळतं की, कुणीच कुणाचं नसतं.

भेटत नाहीत बोलत नाहीत, गुन्हा तरी काय? जे वाटतं ते बोलून, रड धाय धाय.

शक्य आहे ताण जाऊन, वाटेल हलकं हलकं. गुळणी धरून बसू नका, व्हा थोडं बोलकं.

कोण चूक कोण बरोबर? हिशोब करून टाका. प्रत्येक क्षण जगून घ्या, घालवू नका मोका.

त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका.

आपली मतं दुसऱ्यावर, मुळीच लादू नका. समोरच्या व्यक्तीचा, अंत बघू नका.

कोणताही विषय असो, जास्त ताणू नका. मीच शहाणा बाकी मूर्ख, असे मानू नका.

कोण म्हणतं गोड बोलून, प्रश्न सुटत नाही. अनेकदा समजूतदार, माणूस भेटत नाही.

जिभेवर साखर ठेवा, होणार नाही कधीच वाद. आवडल्यावर मनातून, द्या की हो दाद.

तडतड बोलून, उगीच मनं नका नासु. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका.

बचतच कामी येते, खर्च कमी करा. जरी मोठा झालास, तरी रहा जमिनीवर.

विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका.

ठीक आहे चूक नाही, तरीही जुळतं घ्या. शरीर मृत होण्या आधीच, आलिंगन द्या.

स्मशानभूमीत चांगलं बोलून, काय उपयोग आहे. जिवंतपणी कसे वागलात, हेच जास्त महत्वाचं आहे.

माझ्या कवितेत कोणतंही, तत्वज्ञान नाही. तुम्ही खुशाल म्हणू शकता, कवीला अजिबात भान नाही.

ठीक आहे, तुमचा आरोप मला मान्य आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, वाद नको फक्त बोला.

काय माहीत उद्या आपण, असू किंवा नसू. आयुष्य खूप छोटं आहे, भांडत बसू नका !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page