top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६३"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

Updated: Dec 5, 2023


ree

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६३"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रम देखील नीट नेटका झाला.जे माजी विद्यार्थी काही कारणास्तव आदल्या दिवशी लोणावळ्याला येऊ शकले नाहीत ते आवर्जून बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. लोणावळ्याचा कार्यक्रम हा मौजमजेचा असला तरी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रम हा सामाजिक जबाबदारीची जाणिव करून देणारा होता.हेच या सुवर्ण महोत्सवी स्नेह संमेलनाचे यश मानावे लागेल.

बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रम जेवढा रेखीव तेवढाच हृद्य ! आपल्यात नसलेल्या तीस मित्रांना कोणीही विसरले नाही.सर्वांना भावपूर्ण "श्रध्दांजली" अर्पण करण्यात आली.सर्व मित्र-मैत्रीणींचे हे आदर्श वर्तन डीन साहेबांना व पाहुण्यांना मनापासून भावले.

कार्यक्रमाची सांगता कॅटीनमधील सुग्रास भोजनाने झाली. शेवटचा दिन गोड झाला ! हा "गोडवा" काॅलेज समोर "समूह फोटो" मधे कायमचा बंदिस्त करण्यात आला.तो सदैव स्मरणात राहील.शिवाय गुगलवर प्रक्षेपित केलेले दोन्ही दिवसांचे असंख्य फोटो वेगळेच ! किती पहाल आणि काती नाही !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page