top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६७"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६७"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

हे "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" अपर डेक रिसाॅर्ट, लोणावळाच्या "मद्यसंस्कृती" मुळे रसिकांच्या चांगलेच स्मरणात राहिल.अरसिक महिलांचा "रोष" नको म्हणून रसिक पुरूषांकडून मद्यासाठी वेगळी "वर्गणी" काढली होती. त्यामुळे आरतीने सगळ्या पुरूषांच्या नाकावर टिच्चून घरूनच फ्रांसहून आणलेली अस्सल "शॅंपेन" आणली व "STAR OF BJMC-1973 Batch" अमेरिकेचा न्युराॅलाॅजिस्ट राजीव मोतीवाला याच्या शुभहस्ते "तोफ" उडवून ती सर्व महिलांना वाटली.आहे का आव्वाज ?

भारतीय संस्कृतीत "मद्य परंपरा" खूप प्राचीन काळापासून समृद्ध आहे. विविध प्रकारची मद्ये तयार आणि सेवन केली जायची.मद्यपान भारतात कधीच निषिद्ध नव्हते. फक्त ब्रिटिश सत्ता आणि पेशवाईचा काही काळ सोडला तर मद्यपान बंदी भारतात कधीच नव्हती. मद्यपान करणे हे तुच्छतेने पाहिले जात नव्हते. विविध मद्य निर्मिती विधी हे रिकाम्या वेळचा विरंगुळा नव्हता. म्हणूनच विविध मद्य प्रकार आणि त्यांचे गुण दोष यांची सविस्तर चर्चा आयुर्वेदात आहे. तसाच बहुतेक प्राचीन लिखाणात मद्यपान विधी मुक्तपणे, सहजतेने वर्णन केलेला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियाही मद्यपान करत असत. उल्लेखनीय गोष्ट अशी, की, मद्य हे मर्यादित प्रमाणात घ्यावे हेही सांगितले आहे. अति मद्यसेवन हे फक्त आरोग्यच नव्हे तर दैनंदिन जीवन सुद्धा दूषित आणि नष्ट करते ही सूचनाही केलेली आहेच.

सर्वांना हे "भारतीय मद्यविज्ञान" चांगलेच माहित असल्याने आपल्याच मित्रांनी सादर केलेला मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतानाच "मद्यास्वादाचा आनंद" लुटायला प्रारंभ करण्यात आला.भोजनाची वेळ होईपर्यंत नेेहेमी घडते तेच घडले.कमी पडली हो ! मग जे हाताला लागेल ते ! "मिक्सिंग" वगैरे गेले "तेल" लावत !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page