"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७४"
- dileepbw
- Dec 4, 2023
- 2 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७४"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन संपन्न होऊन एक सप्ताह पूर्ण झाला असला तरी अजूनही त्याची "झिंग" काही मनातून जात नाही.पण स्नेहसंमेलनाला उपस्थित न रहाता सतत गटावर "मिठाचा खडा" टाकणारे व त्यांना पाठिंबा देणारे काही मोजके मित्र गटावरचे सौदार्ह्याचे वातावरण सतत बिघड

वत असतात.त्यांनी कृपया आपले राजकीय विचार मुख्य गटावर न मांडता उपगटावर मांडावेत.ही नम्र विनंती.
तीन राज्यात "कमळ" फुलल्यामुळे गटावरील "पंजे" वाले निराश होणे स्वाभाविक आहे.या नैराश्यापोटी मतमोजणीत हेराफेरी झाले असे ज्यांचे मत आहे त्यांनी ते मीडीयामधे अवश्य मांडावे.पण कृपया या गटावर नको ! किशाने पाठवलेले "राजकीय काव्य" उपगटावर योग्य ! पण येथे नको !
गटावर "आप" समर्थक देखील असू शकतील.त्यामुळे ते "तिहार" मध्ये वाढत आहेत हे शब्द त्यांना बोचतील व ते गटावर कळवळतील.त्याने काय साधणार ? "निर्भय बनो" वाल्यांना या निकालांनी धक्का बसला असला तरी त्याचे धक्के या सुह्रदांच्या गटाला कशाला ? गटावरील तीन-चार जणांचे "पुरोगामी टोळके" कशाकरिता नाराज करायचे ? "मराठी वाहिन्या" अस्वस्थ असतील व त्यांना सुतक लागलेले असेल तर तर ते खुशाल लागो.आपण कशाला अस्वस्थ व्हायचे ?
कथित राजकीय विश्लेषकांनी तोंड लपवले असले तरी आपण आपले उजळ माथ्याने सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा आनंद लुटू या ! मराठी पत्रकारितेला जो काय "पक्षपात" करायचा आहे तो खुशाल करू द्या. सेक्युलरवादी लोकांचा जो काय द्वेष उफाळला आहे तो राजकीय घोडे बाजारातच राहू घ्या ना ! आपल्या घरात कशाला आणायचा ? आधी जे काय झाले ते पुरेसे झालेले नाही की काय ?
या निकालाने अनेक "बुद्धिजीवी" तोंडावर पडले आहेत.पडू देत ! आपण पडायचे नाही.या निकालामुळे "चाय-बिस्कुट कंपू" सैरभैर झाला आहे.त्यामुळे तो इव्हीएमला दोषी ठरवत आहे. त्यात इकबाल व मंगलने सामिल व्हायचे काहीच कारण नाही.आज ते मतदारांना शिवीगाळ करीत आहेत, उद्या आपल्याला देखील करतील ! कर्नाटक रिपीट न झाल्याने गटावरील हे "लिबरल" बेचैन आहेत.त्यांच्याकडे सध्या दुर्लक्ष करणेच योग्य राहिल."इंडि" आघाडीचे ऐक्य धोक्यात आल्याने ही मंडळी गटावरील ऐक्याला बाधत आणा आहेत. त्याला कृपया कोणीही बळी पडू नये.हे विनम्र आवाहन !
"पनौती(पनवती)" कोण हे या निकालाने पुरेसे सिद्ध केले आहे.भाजपा विजयाने देश आनंदी असताना "हिंदू विरोधक" मात्र दुःखी आहे.जन्माने हिंदू असलेले पण कर्माने सेक्युलर, लिबरल,पुरोगामी असलेले काही जण आपल्या गटात आहेतच. त्यांनी कृपया आपले विचार आपल्या जवळच ठेवावे व गटावर शांतता राखावी.ही नम्र विनंती !






Comments