top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

सुभाषने BJMC-1973 Batch" च्या वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या "अपर डेक रिसाॅर्ट, लोणावळा" या वैशिष्ट्यपूर्ण स्थळाचे काहीच वर्णन न करता त्याला अतिशय "विहंगम स्थळ" असे म्हटले आहे.उच्च मराठीमधे "विहग" म्हणजे पक्षी ! उंचावरून उडणार्‍या पक्षाला जे दिसते ते "विहंगम दृश्य" ! आंग्ल भाषेत "बर्ड्स आय व्ह्यू" ! असे काय आहे या "अपर डेक रिसाॅर्ट, लोणावळा" मधे ? मा.डाॅ.गुरूराज मुतालिक सरांनी त्यांच्या भाषणात फार छान उल्लेख केला आहे पहा !

"अपर डेक रिसाॅर्ट" हे लोणावळा परिसरातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सर्वोच शिखर ! म्हणून त्याचे नाव "अप्पर" ! "अल्याड डोंगर,पल्याड डोंगर,मधेच खोल खोल दरी,जरा जपून चाल गं पोरी" असे वारंवार विनवून सुध्दा सर्व वर्गमैत्रिणी फोटो खेचण्यासाठी सारख्या तिकडेच धाव घेत होत्या !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page