top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८२"

  • dileepbw
  • Dec 6, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८२"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

१९७३ साली प्रवेशित झालेल्या २०० विद्यार्थ्यांमधील हयात असलेल्या १७० विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला उपस्थित होते.अनेक जण पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने सगळ्यांच्या गळ्यात मोठ्या अक्षरात नाव लिहिलेले "मंगळसूत्र" अडकविण्यात आले होते व सर्वांच्या परीचयाच्या एक दोन तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रत्येकाने एक ते दोन मिनिटात आपली व आपल्या कुटुंबियांची माहिती सांगायची होती. त्याच वेळी पडद्यावर आधीच भरून दिलेली माहिती फोटोसह दिसेल अशी रचना करण्यात आली होती.

"BJMC-1973 Batch" चे "स्टार्स" म्हणजे न्युराॅलाॅजिस्ट राजीव मोतीवाला व नसली इच्छापुरीया,स्त्रिरोगतज्ञ विवेक जोशी,संजीव खुर्द व युजीन फर्नांडीस,बालरोगतज्ञ नझीम मर्चंट व जगदीश ढेकणे ! यांचे कर्तृत्व ऐकणे ही एक मोठी पर्वणीच ! सांगेन क्रमाक्रमाने !

सुरुवात नसली इच्छापुरीयापासून करतो ! सह्याद्री हाॅस्पिटल, नगर रोड येथे न्युराॅलाॅजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेला नसली "स्ट्रोक मॅनेजमेंट" या विषयातील जागतिक पातळीवरचा तज्ञ ! अनेक पारितोषिकांचा मानकरी ! ऐका त्याची मिहिती !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page