"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८३"
- dileepbw
- Dec 6, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८३"
"BJMC-1973 Batch" चे
वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
१९७३ साली प्रवेशित झालेल्या २०० विद्यार्थ्यांमधील हयात असलेल्या १७० विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला उपस्थित होते.अनेक जण पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने सगळ्यांच्या गळ्यात मोठ्या अक्षरात नाव लिहिलेले "मंगळसूत्र" अडकविण्यात आले होते व सर्वांच्या परीचयाच्या एक दोन तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रत्येकाने एक ते दोन मिनिटात आपली व आपल्या कुटुंबियांची माहिती सांगायची होती. त्याच वेळी पडद्यावर आधीच भरून दिलेली माहिती फोटोसह दिसेल अशी रचना करण्यात आली होती.शिवाय ही मिहिती eDirectory मधे देखील प्रकाशित केली जाणार आहे.
"BJMC-1973 Batch" चा संशोधक वृत्तीचा स्त्रिरोगतज्ञ म्हणजे के.ई.एम.रूग्णालय,पुणेच्या स्त्रिरोग विभागाचा प्रमुख विवेक जोशी ! त्याच्या नावावर काही शस्त्रक्रिया या जागतिक पातळीवर गाजलेल्या आहेत.आता पर्यंत डझनावरी स्त्रिरोगतज्ञ निर्माण केलेला विवेक जोशी एक उत्तम शिक्षक म्हणून ओळखला जातो.






Comments