"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ९"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ९"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
या स्नेहसंमेलनाने "शिंग मोडून वासरात शिराय" ची संधी प्राप्त करून दिली खरी ! विद्यार्थीदशेत घरून डबे बांधून शाळेत पोहोचयाचो तसा मी शनिवार दि.२५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी सकाळी सकाळीच बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात जाऊन पोहोचलो."हेची फल काय मम तपाला ?" या उक्तीची आठवण करून देणारा पहिला झटका गेटवरच बसला.रिक्षा गेटमधून सोडण्याआधी सुरक्षारक्षक "ओळख" मागू लागला.निवृत्तीनंतर जसे सायबाला कोणी पुसत नाही,तसेच पास होऊन गेल्यावर माजी विद्यार्थ्याला देखील कोणी आळखत नाही.असो. काळाचा महिमा अगाध आहे !
आमचे भांडण अधिक रंगायच्या आत चिंधेसाहेब तिथे पोहोचले व त्यांचा "शासकीय दणका" बसताच सुरक्षारक्षक ठिकाणावर आला व आम्ही दोघे एकदाचे आत शिरलो. कुणाचाच पत्ता नसल्याने काॅलेजच्या पायर्यांवरच ठाण मांडले.हळूहळू वीस जणांचा "कोरम" फुल्ल झाला व शेट्ट्याकडे "चहापान" करून आमची वरात अप्पर डेक, लोणावळाकडे निघाली.वाटेत ठुबे व सोनावणेचे पार्सल उचलताच गाडीने वेग पकडला व गप्पांना रंग चढू लागला.
पक्याने "भेंडी बाजार" अजिबात नको अशी घेषणा करून "बंबईसे आया मेरा दोस्त" या गाण्याच्या चालीवर एक भन्नाट विडंबन सादर केले.तुम्ही पण जरूर ऐका.हसूहसून "लोटपोट" होऊन जाल.मग सर्वांनाच ऊत आला.देविदास चित्तेच्या "भक्ती संगीता" ला मंडोराने "हुस्नने लाखो रंग" चा मादक रंग चढवताच उदयला पण स्फुरण आले.कधी लोणावळा आले ते कळले देखील नाही !






Comments